सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ वा वर्धापन दिन समारंभ आयोजित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ वा वर्धापन दिन समारंभ आयोजित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ वा वर्धापन दिन मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर वर्धापन दिन समारंभाच्या प्रथम सत्रात ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ व नॅशनल रिसर्च प्रोफेसर मा. डॉ. रघुनाथ माशेलकर हे उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी हे राहणार आहेत.

समारंभाच्या दुपारच्या सत्रात पुरस्कारप्राप्त व्यक्ती तसेच महाविद्यालये व परिसंस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये युवा गौरव पुरस्कार तसेच उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट परिसंस्था पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या प्रसंगी मा. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, प्रभारी कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (webcast.unipune.ac.in) करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७ वर्षांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व सामाजिक योगदानाचा गौरव करणारा हा वर्धापन दिन समारंभ साजरा करण्यात येणार असून, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालये व परिसंस्थांचे प्राचार्य व संचालक, पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्ती, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *